पब्लिक एकेका शब्दावर इतका छल करतं की  कविचा कमालीचा छळ होतो.

वास्तविकात कवी त्याच्या उर्मित सहज लिहून गेलेला असतो आणि रचना अर्थ आणि लय घेऊन आलेली असते पण नंतर मात्रा आणि शब्दबदल यांचा असा काय काथ्याकूट होतो की बोलता सोय नाही.

मिलींद, कवितेला सिंगल ओरियंटेशन हवं. म्हणजे विचारांचा प्रवाह एकदिशीय हवा, त्यानं कविता अर्थपूर्ण होते  असं मला तरी वाटतं.

या कवितेचा साधारण आषय, देवाचा उपयोग  करून मोहाला दूर सारले असा असेल तर प्रत्येक कडव्यात वेगवेगळा विचार मांडला आहे असं वाटतं. उदाहरणार्थ

कशाला, सखे, मंदिरी जाग्रणे ती?
तुझ्या बाहुपाशात सत्संग केले

इथे बाहुपाशातले सत्संग मंदिरातल्या जाग्रणापेक्षा सार्थक ठरले असा विचार आहे. पण इथे मात्र श्रीरंगानं श्रीवर मात करण्याचा प्रयत्न आहे!

मना मोह होता सदोदीत श्रीचा
मुखे नित्य "श्रीरंग, श्रीरंग" केले

कवितेत शेवटी म्हटलंय

पहा दूर सारून हा शब्दपडदा
मनाचे उघड अंग-प्रत्यंग केले 

म्हणजे कवितेला नक्की काय साधायचंय? मनाला उघड करायला शब्द वापरलेत पण अर्थाकडे पाहा तर कळेल, असं सांगायचं आहे का?

आणि तसं जरी असलं तरी सार्थक सखी सहवासानं श्री या कल्पनेवर वर मात कुठे होते? थोडक्यात, या ओळींशी :

कशाला, सखे, मंदिरी जाग्रणे ती?
तुझ्या बाहुपाशात सत्संग केले

शेवट जोडला जात नाही. कविता एका एकसंध विचाराची सलग अभिव्यक्ती वाटत नाही.