एकदा सुरुवात झाली म्हटल्यावर तो तरी काय करणार बिचारा! पण मूळ काव्यविषय बाजूलाच राहातो हे निश्चित.

शेवट जोडला जात नाही. कविता एका एकसंध विचाराची सलग अभिव्यक्ती वाटत नाही.

>माझ्या अल्प ज्ञानानुसार ही गझल आहे आणि गझल ही   'एकसंध विचाराची सलग अभिव्यक्ती '  असलीच पाहिजे असे नाही. 
मनोगतावरील 'गझलेची बाराखडी' पाहावी.

= गज़ल उर्दूतनं घेतलेला काव्यछंद आहे. पण मूळ अभिव्यक्तीत एक समान धागा असतो. म्हणजे एकदा यमन सुरु केल्यावर यमनच गावा असा संकेत आहे. तसं केलं नाही तर रसपरिपोष होत नाही. उर्दूत येणारे शेर हे काव्यविषयाशी एकदम फारकत घेणारे (किंवा परस्परविरोधी) कधीही नसतात. उदा.
छु लेने दो  नाजूक होटोंको मध्ये
अच्छोंको बुरा साबित करना दुनियाकी पुरानी आदत है
अशी पहिली ओळ आहे. पण दुसरी ओळ 'इस मयको मुबारक  चिज़ समझ मानाके बहुत बदनाम है ये' अशी आहे.
दुसरी ओळ तिच्या ओठांच्या मदिरेशी संबंध जोडतेच! तस्मात 'गझलेच्या बाराखडी' शी रसाविष्कार आणि सौंदर्यदृष्टी या दोन्ही अंगांनी असहमती दर्शवतो.