बाँडेड लेबर (bonded labour)  ला मराठीत काय म्हणतात? मनोगतावर उपलब्ध असलेल्या शब्दकोशात  बंधपत्रित श्रमिक, बंधपत्रित कामगार असे शब्द मिळाले आहेत. ते मला जरा जड वाटत आहेत. शिवाय ते कानावर येतात तेव्हा ते 'राजपात्रित' च्या जवळ जातात आणि आणि त्यामुळे अर्थापासून फारच दूर जातात.  हिंदीत बंधुआ मजदूर म्हणतात. असा काही सोपा शब्द मराठीत आहे का?