>>>>>> सर्पदंश झाला तर उपलब्ध सर्व पर्यायांमध्ये वैद्यकीय उपचार हाच एकमेव पर्याय परिणामकारक आहे, यात दुमत नाही. आधुनिक वैद्यकियशास्त्र आता सर्वमान्य झालेले आहे पण सर्पदंश झाला तर इस्पितळात पोहचण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर तेथे जो कोणता पर्याय उपलब्ध असेल तो स्वीकारणे रोग्याची अपरिहार्यता असते, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे वैद्यकियशास्त्र वगळता अन्य पारंपरिक उपचार करून घेण्याचे व्यक्तीचे पर्यायस्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. <<<<<

समजा वैद्यकीय उपचार चार तासावरील अंतरावर उपलब्ध आहेत. मांत्रिक त्वरित उपलब्ध आहे. दंश झाल्यावर मांत्रिकाने दोन तास उपचार केले. त्यानंतर चार तासांवरील अंतरावर दंशपीडिताला नेऊन उअपचार केले तर उपचारासाठी दोन तास विलंब होईल.

फुरशासारखा साप चावल्यास दोन ते आठ तासात मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करावे? संदिग्ध भूमिका घेऊन चालणार नाही. ठाम आणि ठोस निर्णय घ्यावा लागेल. मांत्रिक किंवा वैद्यकीय उपचार यापैकी एकच पर्याय निवडावा लागेल. म्हणून जादूटोणाविरोधी कायद्याची जरूर आहे असे मला वाटते. कोणत्याही पचारपद्धतीत रुग्णहितालाच प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. मग पारंपारिक उपचारपद्धतीविरूद्ध कायदा करावा लागला तरी.

# इथे पाऊस, पूर, भूकंपादी नैसर्गिक आपत्तीमुळे रहदारी, दळणवळण तुटणे वगैरे शक्यता विचारात घेतलेल्या नाहीत.