<<<< आपण माझ्याकडून दुखावले गेलां असल्यास माफ करा. >>>
कांदळकरजी, कृपया "माफ़ करा" वगैरे सारखे शब्द वापरू नयेत. तुम्ही लिहिले ते किंवा मी लिहितो ते, यात वैयक्तिक स्वरूपाचे काहिही नाही. मते-मतांतरे असणेही गैर नाही. त्यामुळे मी दुखावला जाण्यासारखेही यात काहीच नाही.
मात्र एकदा स्विकारलेली भूमिका ही जर प्रामाणिक असेल तर, ती भूमिका कोणाला लागू पडेल कुणाला नाही, याची तमा बाळगण्याचे काहीच कारण उरत नाही. कारण भुमिका जर व्यक्तिनुरूप किंवा परिणामांची भीती बाळगून बदलत असेल तर तिला भुमिका तरी कसे म्हणता येईल?
असो, कधी तरी बोलुयात सविस्तर.