लेखाचा बराच मोठा भाग चक्रधरच्या वारीनेच व्यापला आहे त्यावरून वारी हाही सणच आहे व त्याची आखणी  पुराणकाळी झाली आहे आणि हे शेतकऱ्याच्या मुळावर येत आहे किंवा त्याचसाठी ही वारीची योजना झाली आहे असे निष्कर्ष केवळ लेखकच काढू शकतील, ज्यात काहीच तथ्य नाही. येथेही वारीस जाण्याचा विचार शेतकऱ्याने स्वतः केलेला नाही तर त्याच्या सावकाराने ही कल्पना त्याच्या डोक्यात भरवली दृष्टांत वगैरे अंधश्रद्धेचाच मामला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासही लेखकाने नावेच ठेवली आहेत चक्रधराची मानसिकता बदलण्याची तसदी मात्र  लेखकाने का घेतली  नाही  समजत नाही्  हा लेख बाचून ती बदलेल असा गैरसमज तर लेखकाने करून घेतला नाही ना?