सण साजरे करू नका किंवा अंथरुण पाहून पाय पसरावेत, ही शिकवण विसरल्यानंतर आणखी काय होणार? जितके कर्ज मोठे तितकी पत मोठी, असा नवा फंडा समाजात रूढ होतोय. वड्याचे तेल वांग्यावर लावून अधांतरी दोषारोपण करण्यात काय हंशील आहे?
वारी नित्यनियमाने करणारे वडील दुर्धर आजारामुळे वारी चुकतेय, याची खंत करीत असताना त्यांचा व्यसनी मुलगा केवळ पित्याने शस्त्रक्रियेला तयार व्हावे, यासाठी 'मी वारीला जातो... ' सांगून गेला नि वडिलांचा पाय शस्त्रक्रिया न करताच बरा झाला, हे उदाहरण माझ्या पाहण्यात आहे. याला काकतालीय न्याय म्हणून नाकारता येत नाही. अशी अनेक उदाहरणे अनेक जणांकडून ऐकावयास मिळतातही. वारी करणे म्हणजे सण नव्हे, पण आहे, हे निष्ठावंत वारकऱ्यांकडे पाहून उमगते.
चक्रधर वारीला गेला, म्हणून नको ती परिस्थिती ओढवली, हे म्हणणे अजिबात पटत नाही. ऋतुबदलामुळे वारी न करणाऱ्या कित्येक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच.