गणपतिपूजन जेथे धूमधडाक्याने आणि अत्यंत भक्तिभावाने केले जाते त्या दक्षिण कोंकणात पंचखाद्यातला मुख्य जिन्नस भाताच्या लाह्या हा असतो. इतर पदार्थ सगळे मिळून कमीतकमी पाच पाहिजेतच, जास्तसुद्धा चालतात, बहुधा जास्तच असतात. ज्याला जसे परवडेल तसे काजू, शेंगदाणे, सुके खोबरे(हे पाहिजेच), डाळ्या, तीळ, खारीक, बदाम वगैरे  घातले जातात. हे सर्व मिश्रण गुळाच्या पाकात घोळवायचे, किंचित सुके करायचे. दर्शनाला येणाऱ्याजाणाऱ्यांच्या हातावर यातलाच मूठभर प्रसाद ठेवायचा अशी पद्धत आहे.