बहुसंख्य मातांच्या बाबतीत वरील भाष्य अगदी बरोबर आहे. सरोगेट मदरपेक्षा सिंधूताई सपकाळ हा पर्याय केव्हाही श्रेष्ठच. परंतु सर्वसामान्य स्त्री मनाचा एवढा मोठेपणा दाखवू शकेल का?
१. एखाद्या स्त्रीला तिच्या शारिरिक व्यंगामुळे मातृत्व मिळत नसेल तर तिला तिच्या निकटवर्तीय स्त्री सरोगेट मदरपासून स्वतःचे मूल मिळू शकेल. अशा वेळी त्या संततीला एकाच वेळी देवकी आणि यशोदेचे प्रेम मिळू शकेल. अर्थात हा तार्किक विचार झाला. खरेच असे घडते की नाही ते काळच ठरवेल.
२. हल्ली आपण वाचतो की खासकरून काही मातांना खासकरून पाश्चात्य देशात मूलच नको असते.अशा अनवधानामुळे झालेल्या संततीचे मग ती माता भयंकर हाल करते. मुलांचे असे हाल होऊ नयेत म्हणून काही देशात कायदे पण झालेले आहेत. असे बालकांचे हाल झालेले कुठे दिसून आलेच तर जागरूक शेजारी पोलिसांना कळवतात आणि ते मूल हाल होण्यापासून बचावते. अर्थातच अशी उदाहरणे सध्या तरी अपवादात्मकच आहेत. पण काही शहरात त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.
३. समाजसंस्था ही एक परिवर्तनशील संस्था आहे. औद्योगिक क्रांतीनंतर बरीच वर्षे कामगारांची पिळवणूक होत होती. परंतु आता परिस्थिती संपूर्ण समाधानकारक किंवा आदर्श अशी नसली नक्कीच आशादायक आहे. शेवटी समाजाच्या प्रत्येक घटकात त्या त्या समाजाचे गुणावगुण उतरतात. जसे सर्वसाधारण भारतीय पुरुष हा प्रेमळ पती आणि प्रेमळ पिता असतो. किंवा आपल्या मित्राच्या मुलीशी लग्न करणे हे अरबी समाजात सर्वसामान्य आहे. तसे ते समाजाचे गुणावगुण कुटुंबव्यवस्थेत सरोगेट मदर, आईवडील आणि सरोगेट संतती यांत देखील उतरतीलच. सरोगेट मदर्सची संख्या जेव्हा खूप वाढेल तेव्हा त्या त्या भूमिकेतले आदर्श समाजातूनच उभे राहतील