प्रा. मेघःश्याम सावकार यांच्या ‘श्रीमत् आद्यशंकराचार्य कृत विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र भाष्य प्रबोध सुधाकर’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत उल्लेख आहे की, ‘आचार्य विनोबा भावे ह्यांचेही विष्णुसहस्त्रनामावर अत्यंत प्रेम होते. त्यांनीही शांकरभाष्यानुसार विष्णुसहस्त्रनामाचा अर्थ सांगणारा ग्रंथ लिहिला आहे. -भगवद्गीतेने बुद्धीला पौष्टिक खुराक मिळतो, पण तडफडणार्या मनाला भक्तीचे मंगलस्नान मात्र विष्णुसहस्त्रनामच घालते, असे आपल्या विष्णुसहस्त्रनामावरील पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी (विनोबाजींनी) लिहिले आहे.’
या ग्रंथाच्या उपलब्धतेविषयी आपण काही मार्गदर्शन करू शकाल का? धन्यवाद.