एका वर्तमानपत्रातील या विषयीच्या एका लेखातून माझ्या असे वाचनात आले आहे कि आपल्या देशातील फार क्वचितच लोक या तंत्राद्वारे मुल प्राप्त करून घेतात, पण परदेशात असे मुल प्राप्त करून घ्यायला जितका खर्च येतो त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी खर्च आपल्या देशात त्या लोकांना येतो, त्यात त्यांचा इथे वर्षभर राहण्याचा व सरोगेट स्त्रीच्या रकमेचाही समावेश आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परदेशी लोक इथे येउन मुल पदरात पाडून घेउन जातात. त्यासाठी त्यांना फक्त असे काम करणाऱ्या रुग्णालयाशी संपर्क करायचा असतो, स्त्री मिळवण्यापासून ते मुल होईपर्यंतचे सर्व सोपस्कार संबंधित रुग्णालय करते, त्यामुळे यात धंदेवाईकपणा होईल अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे.