तुम्ही वर्णिलेल्या घटनेवरून माझी मतं खालीलप्रमाणेः
कुठल्याही दांपत्याला आई-वडील होणं का नाही आवडणार?
दत्तक घेण्यात मला तरी काही अयोग्य वाटत नाही. उलट ह्यात सामाजिक बांधिलकी दिसून येते. (सासूबाईंना इतर तिघे मिळून कन्व्हिन्स करू शकतात.)
पण दत्तक घेण्यात एकूण दोन पैलू मला दिसताहेत.
१. आधीच त्या दोघांवर तीन मुलांची आणि दोन ज्येष्ठांची जबाबदारी आहे. आता प्राप्त परिस्थितीत, त्या ३ मुलांवर ते सगळे माया करत आहेत.
आता जेंव्हा दत्तक अपत्य घरात येईल तेव्हाही मीना त्या ३ मुलांवरचे प्रेम असेच ठेऊ शकेल का? शक्यता जरा कमी वाटते!
सासूबाईंच्या नकारामुळे, नव अपत्याला परकं वाटत राहील का? हेही पाहिलं पाहिजे. म्हणजे, जेव्हा त्या नव्या पाहुण्याला समजायला लागेल, तोपर्यंत सासूचा नकार हा होकारात बदला गेला पाहिजे. आता चार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आली. जबाबदारी वाढली.
२. आता, दत्तक घेतल्या जाणाऱ्या अपत्याबाबत. शक्यतो, मूल २ वर्षांपेक्षा मोठे असावे. कारण, मेंदूशी निगडित काही रोगसदृश अवस्था
(उदा. ऑटिजम) ह्या,  ह्या वया आधी दिसूनच येत नाहीत. त्यामुळे ती एक बाब स्पष्ट होऊन जाईल. बाकी त्याचे आरोग्य आणि इतर कायद्याशी निगडित गोष्टी वगैरे बघावं लागेल.
बस, आता तरी इतकंच सुचतंय........
(तसं म्हटलं तर, टेस्ट ट्यूब बेबी हा एक पर्याय आहे. )
हा विषय तसा नाजुक आहे. माझ्या ह्या मतांनी काही दुखावलं गेलं असेल तर, क्षमस्व.