शिक्षण घेतल्याने कष्टाला बगल देऊन कुठल्या शॉर्टकटने पैसे कमावता येतात असे गृहितक असल्यास ते साफ चुकीचे आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. प्रगती फक्त पैशातच मोजली जात असेल तर रग्गड कष्ट (बौद्धीक आणि शारीरिकही) करायची मनापासून तयारी असायला हवी. कष्टाला मरण नाही कुठल्याही जमान्यात! 

राहिला प्रश्न शिक्षणाचा.. तर शिक्षणाने वैचारीक कुवत वाढावी ही अपेक्षा रास्त ठरेल असे वाटते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या संकटांशी समर्थपणे टक्कर घेण्यास समर्थ बनवण्यात शिक्षणाचा सिंहाचा वाटा असतो हे निश्चित.