प्राप्त परिस्थितीचा आणि मीना-रमेश ज्या एकूण घटनाक्रमातून गेले आहेत त्याचा एकंदर विचार करता त्यांना स्वतःचे असे कोणीतरी हवे असणे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे असे वाटते. दत्तक घेण्याचा विचार सासूसासऱ्यांसमोर मांडण्यापर्यंत जर त्यांची प्रगती असेल तर त्यांच्यावरील सद्य जबाबदाऱ्यांचा त्यांनी सांगोपांग विचार केला असेलच आणि त्यात सासऱ्यांचा होकार माझ्या या निष्कर्षाला दुजोरा देणाराच वाटतो. असे सारे असताना मीना-रमेश दांपत्याने मूल दत्तक घेणे हे योग्यच आहे असे मला वाटते.