लय भारी लेख! गोधड्या प्रचंड आवडल्या आणि सौ. नेटकेआजींची चिकाटीही.. 

माझी आजीही गोधड्या शिवायची (आताशा पारच थकली आहे) पण तिच्या गोधड्या इतक्या सुबक नसत. विरलेली लुगडी, पुडीचा दोरा आणि दाभणसदृश सुई असा सरंजाम हाताशी घेऊन तिच्या रापलेल्या ओबडधोबड हातांनी लांब लांब टाके टाकून शिवायची ती गोधडी. दिसायला सुबक नसली तरी ऊब मात्र असली भारी असते तिच्या गोधडीत की विचारता सोय नाही. माझ्या आजीच्या गोधडीसारखी गोधडी शिवायला शिकायचे कधीचे मनात आहे.. आता आणेनच म्हणतेय कृतीत. :-)