पंचखाद्य यात पाच ख पासून सुरू होणारे पदार्थ अपेक्षीत आहेत.असे आजी सांगते.पाचवा ख खवा किंवा खिसमीस चालेल.खव्याची खिरापत 5 10 दिवस टिकणार नाही म्हणून खिसमीस चा पर्याय समोर आहे.पण तो मूळ किसमीस असा शब्द आहे असेही कोणी सांगतात.मग ते पंचखाद्यात कसे चालते हे कळत नाही.किंवा आपण गाण्याच्या भेंड्या खेळताना नाही का ळ ला ल असे काही पर्याय निवडतो तसे हे असावे काजू बदाम लांबचे वाटतात ना भेंडी चढल्यासारखी वाटते.त्यापेक्षा किसमीस ला खिसमीस करून वापरणे सोयीचे असावे.आता तो शब्द जर खरेच खिसमीस असेल तर पहिल्या  तीन वाक्यानंतरचा प्रतिसाद अनाठायी समजावा.