बऱ्याच दिवसांनी मनोगतावर आलो आहे. लेखाचे नांव वाचून उत्सुकता निर्माण झाली आणि १ ते ३ तिन्ही भाग एका बैठकीत वाचून काढले. लेखन शैली साधी, सोपी आणि मनमोकळी आहे. त्यामुळे वाचायला अधिकच सुलभ झाले. फक्त प्रत्येक भाग बराच लहान वाटला. कथानक (किंवा वर्णन म्हणा हवं तर.. ) म्हणावे तितक्या वेगाने पुढे सरकत नाहीए. भाग जरा मोठे आणि प्रत्यक्ष स्थळ वर्णनाचे असतील तर उत्कंठा वाढत राहील असे सुचवासे वाटते.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!