अतिशय आवडता रस्सा आहे हा माझा. दाण्याच्या कुटाने चव आणि दाटपणा दोन्ही येतो. हा रस्सा नुसता गरमागरम भुरकायलाही जाम मजा येते.
मी ह्यात ठेचलेले आले आणि नारळाच्या चवाऐवजी नारळाचे घट्ट दूध घालतो. हिरवीगार कोथिंबीर टोमॅटो शिजताना आणि गॅस बंद केल्यावर वरून सुशोभनासाठी टाकतो. काही टोमॅटो गोडसर असतात त्या रश्श्यात साखर टाळून जरा लिंबू पिळायचे. आवडत असेल तर सुपारी एवढे बीटरूट किसून घातले तर रंग अजून आकर्षक होतो.