मोठ्या भावाच्या ३ मुलांची जबाबदारी आहे ही एकमेव समस्या दिसते आहे. त्या दिवंगत भावाने आपल्या मुलांसाठी कांही आर्थिक व्यवस्था करून ठेवली असेल तर चांगलेच आहे. नाहीतर एकंदर ४ (भावाची ३ आणि दत्तक १) मुलांच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी आपल्याला पेलणारी आहे का ह्याचा विचार व्हावा.
दत्तक घेण्याचा भावनिक अधिकार नक्कीच त्यांना आहे. सासूला पटो अथवा न पटो. सर्वांगिण विचार करून आपण मुल दत्तक घेतल्याने कोणावर अन्याय होणार नसेल तर अवश्य दत्तकविधानाचा विचार करावा.