कोण काय वाट्टेल ते सांगो.
एकतर या वयाला संगोपन ज्याम झेपत नाही.
दुसरी गोष्ट, ही मुलं अनौरस असतात (म्हणजे अनाथालयातली) त्यामुळे त्यांची मानसिक घडण जन्मत:च काँप्लिकेटॅड असते.
सर्वात महत्त्वाचं (जे तुम्हाला आता पटणार नाही पण वेळ निघून गेल्यावर कदाचित पटेल), ते म्हणजे आयुष्य हा निव्वळ टाईमपास आहे. इथे मुलं स्वतःची की दुसऱ्याची यानं सूज्ञाला काहीही फरक पडत नाही. घरात आगोदरच तीन मुलं आहेत त्यामुळे त्यांच्यात जीव रमवाणं हा भरपूर टाईमपास आहे. त्यांची शिक्षणं, लग्न, बाळंतपणं अशा बऱ्या भानगडी पुढे येणार आहेत. त्यात हा दत्तकविधान म्हणजे नवा कहार होऊन बसेल.
त्याहूनही महत्त्वाचं, सध्याच्या तीन आणि या नव्या मुलात ज्याम वितुष्ट येतं कारण नो बडी लाईक्स टू शेअर विथ ऍन आऊटसायडर.
त्यात त्या दत्तक मुलाला आयुष्यभर अपरुटेड वाटत राहतं. त्यातून माणूस मुळात कृतज्ञता शून्य असतो त्यामुळे या आईवडीलांपेक्षा आपले 'मूळ आई-वडील कोण? ' असल्या भंपक कल्पनानी त्याला घेरलं (ज्याची घनदाट शक्यता आहे) की सगळी वाट लागलीच म्हणून समजा.
माणूस सल्ला जनरली स्वतःसाठीच मागतो फक्त तो त्यामागे स्टोरी लावत असतो किंवा तर्क फारच दूर न्यायचा झाला तर आपल्या निकटच्या व्यक्तीसाठी मागत असतो (कारण समहाऊ त्या निर्णयाचा परिणाम प्रश्नकर्त्याच्या आयुष्यावरही होणार असतो... नाही तर कुणाला कुणाची पडलेली नसते)
इथे सल्ला देणाऱ्यांना, त्यांच्या प्रतिसादांवरून दत्तक प्रकरणाचा काही एक अनुभव दिसत नाही. तस्मात तुम्हाला योग्य सल्ला हवा असेल तर या भानगडीत पडू नका. संगीत, पर्यटन, व्यायाम, नाटक-सिनेमे, मित्र-मंडळी असे बरे श्रेष्ठ आणि सुटसुटीत टाईमपास जीवनात आहेत.