कथानायकाला केवळ आकर्षण आहे, प्रेमाबद्दल तो ठाम नाही, असे दाखवायचे होते.

हा आशय वाचकांपर्यंत पोहोचविण्यात आपण नक्कीच यशस्वी झाला आहात. अभिनंदन.

अशा वेळी कालमर्यादा ठळकपणे दाखविण्या ऐवजी ढोबळ मानाने काळाचा उल्लेख येऊन वाचकांचे लक्ष आशयाकडे जास्त केंद्रित कसे होईल हे पाहावे. म्हणजेच कथानायकाचे आकर्षण एक 'अहवाल वाचन' न होता त्याचे भावविश्व उलगडणारे व्हावे. रस्त्याचा किंवा विड्याचा संदर्भ जसा काव्यात्मक घेतला आहे तसेच कांहीसे अजून कथानायकाचे भावनिक उलगडणे/उमलणे समोर आले असते तर वाचक अधिक प्रभावीपणे कथेत समरस झाला असता.

निव्वळ आकर्षण आणि अव्यक्त प्रेम ह्या दोन अवस्थांवर वाद/चर्चा होऊ शकते. कथानायकाचे (एकतर्फी) प्रेम होते ते अव्यक्त राहिले की निव्वळ आकर्षण होते ह्यावर लेखकाने प्रामाणिकपणे विचार करावा आणि जर प्रेम होते तर होते ते अयशस्वी झाले म्हणून त्याला निव्वळ आकर्षणाचे लेबल लावणे हे स्वतःलाच फसविणे होईल. आकर्षण अनेकांबद्दल असू शकते. पण माणूस त्यात आकंठ बुडत नाही. पण जेव्हा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तीच मुलगी दिसते. तिला भेटण्यासाठी मन उतावीळ असते ती आता गल्ली सोडून जाणार म्हणून रस्ता (खरं पाहता कथानायकच) उदास होणार ही निव्वळ आकर्षणाची नाही तर 'प्रेम भावनेची' लक्षणं आहेत. असो.

कथा आवडली आहेच. त्यातील तांत्रिकतेवर जरा मत प्रदर्शन केले इतकेच.