कित्येक ठिकाणी काजू, बदाम वापरतात. कित्येक ठिकाणी साखरेच्या पाकात घोळवतात, काही लोक गुळाच्या पाकात घोळवतात, काही लोक जिन्नस नुसतेच मिसळून ठेवतात. पंचखाद्याचे इतके प्रकार खाल्लेले आहेत की 'कमीत कमी पाच जिन्नस हवेत' या व्यतिरिक्त दुसरा नियम नसावा असे वाटते. खवा मात्र फार कमी ठिकाणी वापरलेला दिसला. 'ख'च हवा तर खारीकच का? खजूर का नको? आणि मनुका, बेदाणे नकोत, 'खि'समिसच हवा, हे काही पटत नाही.