मी जे पंचखाद्य खाल्लेले आहे ते नेहमी 'कोरडी रवाळ पूड 'ह्या स्वरूपातले होते. ज्यांच्या ज्यांच्याकडे खाल्ले ते पहिल्या दिवशी मोठा डबा भरून करून ठेवत. ते अनंत चतुर्दशीपर्यंत पुरत असे आणि टिकतही असे.  खजूर थोडा ओलसर, चिकट असतो,  मनुका, बेदाणे मऊ असतात.  खिसमिस म्हणजे बेदाणे असेल तर तेही मऊ असते. त्यामुळे खजूर, मनुका, बेदाणे, किसमिस/खिसमिस गोष्टींची पूड होत नाही .  माझ्या मते पाचवा पदार्थ (पाचवा 'ख' नव्हे!) काजू किंवा बदाम आहे.