सार्वजनिक ठिकाणी (अर्थात संकेतस्थळांवर देखील) आपली मते व्यक्त करताना वैयक्तिक संदर्भ देणे कटाक्षाने टाळावे. अन्यथा विचारांकडे दुर्लक्ष होऊन चर्चा वैयक्तिक हेत्वारोपांकडे झुकण्याचा संभव असतो.  छोट्या गावांमध्ये खासगी जीवन असे फारसे राहत नाही.  बहुतांशी जीवन सार्वजनिक असते.  परंतु शहरी जीवनात आणि विशेषतः माहितीजालावर खासगी माहिती सार्वजनिक करणे आपल्या हिताचे खचितच नसते, याचे भान ठेवावे.