मी चारही भाग वाचून काढले. वर्णन चांगले आहे. थोडासा वेग कमी आहे असं वाटतंय !!
त्याबरोबरच इतरही विषय (उदा. आपल्या यू.के.तील इंग्रजी कर्मचारी, त्यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत, कपडे, पाहिलेली ठिकाणे, इ. इ. ) अनुषंगाने आले तर ते अधिक वाचनीय होईल, असे वाटते. कारण कि आता यू. के.; अमेरिका,इतर देश हे तितकेसे अनोळखी राहिले नाहीत. पण अजूनही तिथल्या माणसांबद्दल , त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल विशेष लिहिले गेलेले नाही. त्यामुळे ते तुम्ही जर टिपलेत आणि कागदावर उतरवलेत, तर वाचायला मजा येईल.
स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व !!
प्रसाद.