आशुतोष,
राजस्थानमध्ये तीन महत्त्वाची ठिकाणे - उदयपूर, जयपूर आणि जोधपुर. ही तिन्ही ठिकाणे म्हणजे एका त्रिकोणाचे बिंदू मानून जर त्याप्रमाणे नियोजन केलं तर साधारणपणे ७ दिवस / रात्री लागतील.
त्यात तुम्हाला जी जी ठिकाणे माहिती आहेत, ती सर्व बघता येतील. (उदा. पाकिस्तान सीमा, वाळवंटातील अनुभव, इ. इ. )
बहुतेक सर्व प्रवास हा दिवसा करावा, मोठ्या शहरांच्या दरम्यान बस आणि रेल्वे या अतिशय सोयीच्या आणि परवडणाऱ्या आहेत . स्थानिक ठिकाणी भाड्याने छोटी वाहने मिळतात (सुमो, तवेरा वगैरे) त्याने तेथील जवळची ठिकाणे पाहता येतील.
राजस्थान पर्यटन महामंडळाच्या आरामदायी हॉटेलांमध्ये परवडणाऱ्या दरांत राहायला मिळाल्यास अतिउत्तम !!
प्रसाद.