ही बातमी दुःखद पण अपेक्षितच . 'सत्यकथा' वगैरे प्रकाशने बंद होण्यामागचे जे कारण तेच इथेही.
शब्दकोड्यांबाबत थोडेसे. शब्दकोडे कायम एकाच व्यक्तीने रचावे अशी अपेक्षा नको. शब्दकोड्यांना मिळणारा प्रतिसाद बघता (आणि ते त्वरित सोडवण्याचे कसब असलेली मीराताई, आजानुकर्ण, टग्या, विसुनाना, केशवसुमार (ही काही चटकन आठवणारी नावे) ही मंडळी बघता) इतर बऱ्याच लोकांना शब्दकोडे रचणे शक्य आहे असे वाटते. मी स्वतः एक छोटे कोडे रचण्याचा प्रयत्न करतो आहे. शब्दकोडे रचण्यात शब्दकोडे सोडवण्याइतकाच, किंबहुना त्याहूनही अधिक आनंद मिळतो हे आवर्जून सांगावेसे वाटते. त्यामुळे 'साथी हाथ बढाना' असे केले आणि सगळ्यांनीच आपापल्या परीने कोडी रचण्याचा प्रयत्न केला तर शब्दकोडे हे मनोगताचे वैशिष्ट्य टिकून राहील.