रावसाहेब, प्रतिसादाबद्दल आभार.
इच्छामरण हे शीर्षक मूळ कथेच्या 'इच्छामृत्यु' ह्या शीर्षकाचं भाषांतर आहे. पण तुमचा मुद्दा मला पटला. मराठीत इच्छामरणचा अर्थ मर्सी किलिंगच्या जवळ जातो ह्याचा मला विसर पडला. इथे माझ्यातला भाषांतरकार घसरला! मूळ लेखकाला 'आजीची इच्छा असेल तरच तिला मृत्यू येईल' असे काहीसे अभिप्रेत असावे. असो. वर वर अगदी गद्य वाटणारे, साधे 'रहीमची आजी' हे शीर्षकही चालले असते असे वाटते.