मराठीत इच्छामरणचा अर्थ मर्सी किलिंगच्या जवळ जातो ह्याचा मला विसर पडला.  इथे माझ्यातला भाषांतरकार  घसरला!

तसे नाही. इच्छामरण शब्दाचा हा अर्थ अलीकडचा. परंतु पूर्वापार ह्याचा अर्थ संबंधित माणसाची इच्छा असेल तेव्हाच त्याला मरण येणे असाच आहे. उदाहरणार्थ महाभारतातील भीष्माला इच्छामरणाचा वर होता म्हणजे काही त्याची मर्सी किलिंग होणार असा वर नव्हता, तर त्याची स्वतःची इच्छा असेल तेव्हाच त्याला मरण येईल असा होता. तेव्हा, तुमच्यातील भाषांतरकार घसरला नसून अर्थग्रहण करण्यात , आणि शब्दास एकच एक अर्थ असतो असे समजण्यात रावांची चूक झाली आहे.