माहितीपर लेखाचा अनुवाद आवडला.

@वरदाः
पहिल्या परिच्छेदाच्या भाषांतराविषयी एक प्रश्न आहे - इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द वापरल्यावर कंसात मूळ इंग्रजी शब्द देण्याचे काही विशेष कारण? क्लिष्ट मराठी शब्दांचे अर्थ वाचकांना कळणार नाहीत म्हणून असे केले म्हणावे तर 'मध्य'साठी central, 'पर्वतश्रेणी'साठी mountain range, आणि 'पायवाटे'साठी trail हेही कंसात स्पष्ट केलेले आहेत. (मात्र हल्ली मराठीत फारसा वापरला न जाणाऱ्या 'विजार' ह्या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द नाही दिला! )  'ल कॉंटे कॅन्यन' रोमनमध्येही दिलेत, मग 'किंग्ज' व 'नेवाडा' का नाही? मुळात विशेषनामे देवनागरीत लिहिल्यावर तीच परत रोमन लिपीत लिहिण्याचे प्रयोजन समजले नाही. माहितीसाठी तळटीपा व दुवे तुम्ही दिलेले आहेतच. ही टीका किंवा तक्रार नाही; ह्यामागील तर्कसंगती जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे विचारत आहे.