लेख आवडला. सर्वच विज्ञानशास्त्रांमागे अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा असते. भूविज्ञानही त्याला अपवाद नाही. ह्या शोधाच्या कथा  ह्या  नेहमीच मानवाच्या चिकाटीच्या आणि पाठपुराव्याच्या कथा ठरत आल्या आहेत. अलीकडेच चार-पाच वर्षांपूर्वी एका जपानी हिमालयारोहण पथकाला सत्तर-ऐंशीं वर्षांपूर्वीचा एक मृतदेह उत्तम स्थितीत गोठून गेलेला असा सापडला. तो  देह सत्तर-ऐंशीं वर्षांपूर्वी   एवरेस्टवर चढाईसाठी गेलेल्या  ब्रिटिश पथकातल्या एका कुशल गिर्यारोहकाचा होता. देहाशेजारील एका कुऱ्हाडीवर/वस्तूवर त्याचे नाव कोरलेले होते त्यावरून त्या देहधाऱ्याची पूर्ण माहिती प्रकाशात आली. वर्तमानपत्रात छापून आलेल्या त्याच्या फोटोतला तो उमदा आणि देखणा चेहरा अजूनही आठवतो. मॅलेट की कायसेसे नाव असावे त्याचे. त्याच्या अपघाती मृत्यूने तेव्हाचे जग हळहळले होते आणि त्याच्या अपघातीच शोधानंतरही तशीच हळहळ वाटत राहिली.
आल्प्स पर्वतराजींमध्येही असे अवशेष सापडल्याच्या बातम्या दहावीस वर्षांतून एकदा कधीतरी वर्तमांपत्रांत येत असतात.
अशा आणखी कथा वाचायला आवडतील.