ते तळे हिवाळ्यात पूर्ण तर उन्हाळ्यात अर्धवट गोठलेल्या स्थितीत असल्यामुळे तो पाय इतका चांगला जतन झाला होता. लेखक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा तो बूट आणि त्यातला पाय पाहिला तेव्हा त्यांना वाटले की विमान कोसळण्याची घटना जास्तीतजास्त दोनेक वर्षांपूर्वीची असेल. मात्र प्रत्यक्षात ती घटना १६ वर्षांपूर्वी घडलेली होती.