कदाचित चालेल ताजे अंजिर वापरले तर. पण मला वाटते देठाकडचा भाग कापून टाकावा लागेल.. त्यात चीक असतो आणि त्याने मिल्क शेक कडू होइल अशी शंका वाटते.. शिवाय ताजे अंजीर आणि सुकवलेले अंजीर याच्या चवित बराच फरक आहे...

तसाच ओले काजु, सुके काजू आणि ओले जर्दाळू सुके जर्दाळू यांच्या चवित पण... खजुर आणि खारिक पण.... या सगळ्या 'सुकवलेल्या' फळांमध्ये हा एक समान मुद्दा आहे...

आणि डाएट वगैरेचा विचार करता साखरे ऐवजी मध आहेच, शिवाय खजुर वापरून चव पण येइल, दाटपणा येइल आणि अधिक गुणकारी पदार्थ मिळेल!