दिवाळी अंक रद्द झाल्याचे जाहीर झाल्यावर काही तासांनी मी दिवाळी अंकासाठी पाठवलेला माझा अनुवाद इच्छामरण
मनोगतावर प्रकाशित केला. त्यापाठोपाठ आणखी पाच सहा अनुवादही मनोगतावर प्रकाशित झाले. अलीकडे मनोगतावर होणारी लिखाणाची आवक पाहाता हे मला जरा वेगळे वाटले आणि ते अनुवादही मुळात दिवाळी अंकासाठी पाठवलेले असावेत असा मी तर्क केला. अर्थात अंकसमितीकडे आणखीही साहित्य आलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही पण तरीही सहा-सात अनुवाद प्रकाशित झालेले आहेत ह्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रस्तावाचा विचार व्हावा.