दिवाळी अंकासाठी पाठवलेल्या लेखनाचे संपादन आणि मुद्रितशोधन होते. आलेल्या साहित्यातून निवडलेले लेखन  जसे आले तसेच्या तसे छापले जात नाही. काही वेळा आलेले लेखन संपादकांनी सुचवलेले बदल केल्यास अंकासाठी स्वीकारार्ह ठरते, अन्यथा ते स्वीकारार्ह नसते. काही वेळा लेखनात तपशीलाच्या चुका असतात त्या सुधाराव्या लागतात.
हे संपादनाचे संस्कार न करता केवळ आलेले साहित्य आले तसे एकाच दिवशी छापल्याने त्याला दिवाळी अंकाची सर येणार नाही, कारण त्याचा दर्जा अंकाप्रमाणे नसेल.

मीराताई म्हणतात तसे अनेकांनी (मी सुद्धा) मूळ दिवाळी अंकासाठी म्हणून पाठवलेले अनुवाद दैनंदिन लेखनात आधीच प्रकाशित केले आहेत. अर्थात सर्वांनी तसे केलेले नाही, पण त्यांना त्यांचे लेखन इतर संकेतस्थळांवरील दिवाळी अंकासाठी पाठवण्याची इच्छा असण्याची शक्यताही गृहित धरायला हवी.