राजेंद्र देवी, मीराताई, वरदा,
प्रतिसादांबद्दल धन्यवाद. ज्यांनी साहित्य प्रकाशित केलं आहे, त्यांचं साहित्य पुनः 'दिवाळी अंक' दुव्यात गुंफता येईल का हे प्रकाशकांना विचारता येईल. (माननीय प्रशासक - आपण याबद्दल मार्गदर्शन करू शकाल का?)
दुसरी
गोष्ट - आपलं म्हणणं मान्य, की 'संपादन' न झाल्यामुळे दर्जाबद्दल सांगता
येणार नाही; पण निदान मनोगतावर प्रसिद्ध होणाऱ्या इतर साहित्याबद्दल जे
निकष (संकेतस्थळातर्फे आणि प्रशासकांकडून) वापरले जातात, तेवढे तरी इथेही
वापरले जातीलच की!
मी सुचवतो आहे हा सर्वोत्कृष्ट उपाय आहे असं मला म्हणायचं नाहीये; पण तो एक 'मनोगत-दिवाळी अंक' बंद होऊ नये म्हणून मला सुचलेला मार्ग/तोडगा आहे एवढंच मला म्हणायचं आहे.
प्रत्येकाचे विचार याबद्दल वेगळे असतील हेही मला पटतं.
त्यामुळे मला खालील पर्याय आतापर्यंत आलेल्या प्रतिसादांवरून सुचवावेसे वाटतात.
(१) 'अनुवाद' ही अट नसावी. अर्थात ज्यांनी अनुवाद किंवा संबंधित लिखाण केलं आहे, त्यांनी १.११.२०१३ ला 'दिवाळी अंक २०१३ - लेखाचं नाव' या रूपात कृपया प्रसिद्ध करावेत.
(२) ज्यांना इतर लिखाण प्रसिद्ध करायचं आहे, त्यांनीही १.११.२०१३ ला 'दिवाळी अंक २०१३ - लेखाचं नाव' या रूपात कृपया प्रसिद्ध करावं.
(३)
ज्यांचं लिखाण आधी प्रसिद्ध झालं आहे, त्यांचं लिखाण अशा रीतीनं प्रकाशित
करता येईल का हा प्रश्न मी प्रकाशकांना या चर्चेतून विचारला आहेच; कृपया
प्रशासक खुलासा करतील का? (किंवा त्या लेखकांना तेच लेख, वरीलप्रमाणे
शीर्षक देऊन पुनः प्रकाशित करता येतील का आणि त्यांवर आलेले प्रतिसाद
प्रशासक या दुव्याकडे वर्ग करतील का? )
( हा थोडा द्राविडी प्राणायाम होतो आहे. मला दुसरा पर्याय सुचत नाहीये त्यामुळे हे सुचवलं. )
- कुमार
ता. क. माझ्यापुरतं मी वरचा पर्याय वापरून लिखाण मनोगतावर पाठवावं (१ तारखेला) असं ठरवलं आहे.