कोणत्याही परिस्थितीत दिवाळी अंक निघावा असे आपल्याला वाटत आहे हे आपला प्रस्ताव आणि वरील प्रतिसाद यातून जाणवत आहे. आपल्या ह्या भावनेबद्दल मला आदर वाटतो. पण असंपादित आणि अ-शुद्धलिखित, विनासजावट अंकाचा दर्जा दरवर्षीच्या अंकांपेक्षा निश्चितच खूप खालचा असेल. वरदा यांनीही आपल्या प्रतिसादात साधारण असेच विचार प्रकट केले आहेत.
मला स्वतःला अंक निघाला नाही ह्यापेक्षाही अंकाचा दर्जा घसरला ह्या गोष्टीचे दुःख अधिक होईल.