मीराताई, वरदा, विनायकपंत,
अंकांचं स्वरूप आणि दर्जा पूर्वीप्रमाणे राहणार नाही हे मला मान्य आहे. आपण खूप वर्षांपासून मनोगतावर विविध दर्जाचं लिखाण वाचलं आहे. तरीही मनोगताबद्दलची आत्मीयता टिकून आहे.
दिवाळीनिमित्त एकत्रितरित्या लिखाणं प्रसिद्ध करून त्या धाग्यांमधून तो ऋणानुबंध/आत्मीयता टिकावी असं मला वाटतं.
विनायकपंत,
आपण लिखाण प्रसिद्ध करणार आहातच, तर ते कृपया १.११.२०१३ ला दिवाळी अंक २०१३ - लेखाचं नाव' या रूपात करून पाहा ना, एवढं आपल्याला नम्रपणे सुचवू इच्छितो.
निदान काही दर्जेदार लिखाण तरी एकत्रित दिवाळी-फराळ/मेजवानीच्या स्वरूपात मनोगतींना मिळेल. 
- कुमार