प्रतिसादाबद्दल आभार.
शीर्षकासंबंधी थोडेसे. ह्या कथेतील मुत्तरसू आणि अग्रवाल ह्यांच्यासारखी राजकारणी , धूर्त, स्वार्थी, संधिसाधू आणि हृदयशून्य माणसे मला नवीन वाटली नाहीत. मला वेगळेपण वाटले ते कथानायकाच्या गुलामगिरीच्या व्याख्येत! त्याला वेठबिगार ही गुलामगिरी  वाटत नाही पण काहीही काम न करता खासदारांच्या बंगल्यात आरामात राहणे  आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणे ही त्याला गुलामगिरी वाटते,  ही गोष्ट मला लक्षणीय वाटली. म्हणून  दास्य हे शीर्षक!

कथेतील शेवटचा परिच्छेद काढून टाकला तर कथेचे रूपच बदलून जाईल आणि ती अशा प्रकारच्या अनेक कथांपकी एक होईल.
(हे सर्व माझे पर्सेप्शन. वाचक कथेचा वेगवेगळा अर्थ लावू शकतात. )