कथा आवडली. अनुवादही चांगला आहे.
मी शाळेत असताना 'अकबरी लोटा' अशी एक गोष्ट वाचण्यात आली होती. एक माणूस आपल्या घराच्या सज्जामध्ये हातात एक लोटा घेऊन पाणी पीत होता. लोट्याचा आकार जरा वेगळा/विचित्र होता त्यामुळे त्याला तो लोटा अजिबात आवदत नसे. असो. तर पाणी पिताना त्याच्या हातून तो लोटा निसटतो आणि खालून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडतो. पण नंतर सुरू झालेल्या भांडणाचा शेवट रस्त्यावरील माणसाने तो 'अकबरी लोटा' (अकबराने वापरलेला लोटा) म्हणून खूप किंमत देऊन विकत घेण्यामध्ये होतो. असो. मराठीत मात्र असे काही म्हणजे -रामशास्त्री प्रभुण्यांची भिकबाळी, रमाबाईंची नथ, आनंदीबाईने ज्या लेखणीने ध चा मा केला ती लेखणी - असे काही कधी वाचले नाही!