मीराताई
तुमची सुचवण योग्य आहे. अंकसमितीचा कामाच्या वेळी वरदाशी माझी यावर चर्चा झाली होती आणि तिनेही अशीच सुचवण केली होती.
त्यावर माझे मत असे होते.
१. इंग्रजीऐवजी मराठी प्रतिशब्द वापरल्याने विरोधाभासाची धार कमी होते.
२. कदाचित म्हणूनच भारतेंदुंनीही आपल्या हिंदी लेखात हे शब्द तसेच वापरले आहेत.
३. वैज्ञानिक, सामाजिक, ऐतिहासिक अशा लेखनात काटेकोर मराठीचा आग्रह अतिशय योग्य आहे. ललित लेखनात थोडी सूट घेता येते.
तिला माझे म्हणणे पटले. तिच्या सुचवणीनुसार सुरुवातीला मूळ लेखातले इंग्रजी शब्द अनुवाद न करता तसेच ठेवले असल्याची टीप लिहिली आहे.
विनायक