श्री. कांदळकर,
आपली लेखमाला मी वाचली. २५ वर्षं ओडिशामध्ये काढूनही काही ठिकाणे मी पाहिलेली नाहीत. पण पुरीचे जगन्नाथ मंदिर मात्र अनेकदा पाहिले आहे.  आपणही ते नुकतेच पाहिले आहे. मी  जालावर जगन्नाथ मदिराचे जे प्रकाशचित्र  पाहिले आहे तेच आपणही इथे दिले आहे. पण आपल्याला ते जगन्नाथ मंदिराचे प्रकाशचित्र वाटते का? जगन्नाथ मंदिरात अशी सुंदर हिरवळ कुठेच नाही. तसेच मंदिराच्या पायऱ्या इतक्या रेखीव अजिबात नाहीत. शिवाय ते मंदिर इतके रिकामे पण कधी असत नाही. असो. आपल्याला काय वाटते?
-मीरा फाटक