फेरीवाल्यांचे समर्थान मी तरी नक्कीच करणार नाही. फेरीवाल्यांमुळे, मोठी भांडवली गुंतवणूक करून दुकान थाटलेल्या, दुकांनदारांचे नुकसान होते. बेकायदेशिर व्यवसायास समर्थन आणि प्रोत्साहन मिळते. परिणामी, वैषम्यग्रस्त दुकानदार जास्त नफा कमविण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनैतिक व्यावसायिक तंत्रे वापरण्यास उद्युक्त होतो.

फेरीवाल्यांवर बंदी घालून दुकानदारांच्या मक्तेदारीवर आळा घालावा, त्यांच्या मालाच्या दर्जाची वारंवार तपासणी करून अंकुश ठेवावा. दुकानदारीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

मॉलसंस्कृती फोफावत असली तरी त्याची आपल्या देशास, समाजव्यवस्थेस गरज नाहीये असे मला वाटते. चंगळवाद, अनाठायी खर्च आणि ऐहिक प्रलोभनाद्वारे समाजाला चुकीच्या मार्गावर ढकलण्याचे कार्य, मॉलसंस्कृतीत, कळत-नकळत घडते आहे.