मॉल्स किंबहुना कोणतीही सुविधा जर खरेच अनावश्यक असेल, लोकांना त्याची अजिबात गरज नसेल तर ती आपोआप बंद पडेल. तिच्याविषयी फारशी काळजी करण्याचे कारण नाही. मुंबईतले काही मॉल्स ओस पडू लागल्याच्या बातम्या येत आहेतच. मुंबईतला पहिला मॉल 'पिरॅमिड' उघडला तेव्हा तिथे तोबा गर्दी होत असे. वाहतूकही खोळंबत असे.  आज तो बंद पडून वर्षे लोटली. परकीय थेट गुंतवणुकीचेही तेच झाले. सरकारी धोरण काहीही असो, दोन्ही बाजूंना- विक्रेता आणि ग्राहक यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर (इकॉनॉमिकली वायेबल) नसेल तर त्यांना लोकाश्रय मिळणार नाही.
संस्कृती वगैरे शब्द वापरले की उगीच राईचा पर्वत केल्यासारखे वाटते. काही शोध, सुविधा काळाच्या पुढे असतात किंवा एखादा समाज काळाच्या मागे असतो. देशकालाची सांगड जुळली  तर प्रकल्प यशस्वी होतो, अन्यथा फसतो.
संस्कृती आपली स्वतःची काळजी घेत स्वतःच्या गतीने चाललेली असते. मॉल वगैरे सारख्या किरकोळ गोष्टींमुळे  तिच्यात फार फरक होणारा नसतो. जे (मानवास-पक्षी- निसर्गास) उपयुक्त असेल तेच टिकेल हा सिद्धांत इथेही लागू आहेच.