कुशाग्र,
आपलं म्हणणं मान्य की आधीच्या संपादकांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे, केलेल्या सजावटीमुळे जे दिवाळी अंकांचं रूप होतं, ते यावेळी राहणार नाही. तरीही जसं आपण मनोगतावर लिखाण करतो आणि ते अशा रीतीनं संस्कारित न करताही स्वीकारतो, तसंच या दिवाळी अंकाचं व्हावं (दिवाळी अंक बंद पाडण्यापेक्षा) असं मला वाटतो.
हा ढाचा मनोगतच्या नेहेमीच्या लिखाण-प्रकाशनपद्धतीशीही जुळणारा आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे जरी आपण हा बदल या वेळी स्वीकारला तरी त्यातून कदाचित (काहीच न घडण्यापेक्षा) चांगलं काहीतरी निर्माण होण्याचीही शक्यता आहेच की.
शेवटी  आवड-निवड वाचक मनोगती ठरवतीलच.
मी पुनः एकदा नम्रपणे आपणांस आणि सर्वांना १ तारखेला 'दिवाळी अंक २०१३ - लेखाचं नाव' अशा रीतीनं प्रकाशनाची विनंती करतो.

उर्वरित भाग येथे स्थलांतरित.