नमस्कार, सर्वप्रथम माझ्या लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, मी जे चांगले आहे ते मान्य करतो या लेखात मी फक्त नवीन पिढीतील अभाव मांडायचा प्रयत्न केला आहे. काळाबरोबर बदलाने म्हणजे वाईट गोष्टी आत्मसात करणे असा होत नाही. ज्या मी ४ गोष्टी मांडल्या आहेत त्यात काय भाबडेपणा आहे ते कळले तर बरे होईल. माणसाची जडणघडण हि लहान वयातच होत असते लहान वयात त्याला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याचेच रुपांतर त्यांच्या वागण्यात होते. आम्ही जगलो ते बालपण असे नाही पण जे बालपण आपण जगतो त्यातून आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आताच्या मुलांचे बालपण हरवले आहे असे माझे ठाम मत आहे. लहान असतानाच मुले एक शिकवणी झाली कि दुसरी दुसरी झाली कि तिसरी असे पूर्ण दिवस त्यांचा अभ्यास आणि शिकवणीत जातो. त्यात शाळा शाळेच अभ्यास आलाच. यातून मुलांना वेळ आहे का? चार भिंतीच्या बाहेर पण काहीतरी जग आहे ते त्यांना जेव्हा कळते त्या वेळी वेळ निघून गेलेली असते, मग ते आपले जे आयुष्य जगलो ते सुखात जगलो असे ते आपल्या मनाला समजावत असतात.