तरीही हा मंगल नसल्यास काय करावे हे सुचवल्यास त्यानुसार करून पाहेन. अत
मनोगताच्या संपादकात लिहिताना मंगल अक्षरवळण उमटणे सहजतेने शक्य नाही. त्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागेल असे वाटते. एचटीएमेल संपादन करून मंगल अक्षरवळणात शब्द जाण्याची व्यवस्था (<फाँट फेस="मंगल"> ... करावी.
अर्थात हा मजकूर सुपूर्त करता येणार नाही. त्याची प्रतिमा त्याआधीच तयार करून घ्यावी.
दुसरा उपाय म्हणजे इतर (सर्वसाधारणपणे मंगल अक्षरवळण वापरणाऱ्या) एखाद्या मराठी संकेतस्थळावरील विनंती असा शब्द शोधून त्याची प्रतिमा चिकटवावी.
तितका रिकामा वेळ असल्यासच एवढा उपद्व्याप करावा. अन्यथा नको.
परिश्रमाबद्दल धन्यवाद.