वरील दोष साधारणपणे काय स्वरूपाचा असावा ह्याचा अंदाज येत आहे; मात्र अद्याप नक्की सांगता येत नाही.
सहज शक्य असल्यास कृपया हे करून सांगावे -
१. हेच (दोषदर्शक) शब्द ठळक (बोल्ड) करून ते कसे दिसतात ते कळवावे.
२. आपल्या न्याहाळक/चालक प्रणालीच्या वरच्याच मांडणीमध्ये वरील शब्द 'मंगल' ह्या सर्वसाधारणपणे मराठी संकेतस्थळांवर सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या अक्षरवळणात (फाँटमध्ये) लिहून त्याच्या प्रतिमा येथे चिकटववाव्या, किंवा त्यांचे वर्णन करावे.
३. शिवाय वरील परीक्षा सहज शक्य असल्यास इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि गूगल क्रोममध्येही (दोन्ही अक्षरवळणांनी) करून काय होते ते सांगावे.
प्रशासन हा दोष निवारण्याचा प्रयत्न करीतच आहे, ह्याची खात्री बाळगावी.
लक्ष वेधल्याबद्दल आणि पाठपुराव्याबद्दल धन्यवाद.