मराठीप्रेमी,
ठीक दिसत आहे तुम्हाला, मला नाही! मला अजूनही अनुस्वार आणि रफारांचे विस्थापन झालेले दिसत आहे. तुम्हाला ठीक दिसत आहे म्हणजे तुम्हाला यापूर्वीही ठीकच दिसत असणार. मी आणि मिलिंद फणसे - आम्हा दोघांना गेल्या तीन-चार आठवड्यांपासून असे दिसत आहे. ज्यांच्यामुळे ही चर्चा सुरू झाली त्या कुमार जावडेकरांनाही अनुस्वार विस्थापित दिसत होते/आहेत. तसेच वरदा यांच्या प्रतिसादानुसार त्यांनाही अनुस्वार विस्थापित दिसत होते /आहेत.
काहींना ठीक दिसते, काहींना नाही. असे का होत आहे याचा छडा लावण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे. प्रश्न दिसण्याचाच आहे असण्याचा नाही. कारण विनंती ('वि'वर अनुस्वार) किंवा निर्जन('न'वर रफार) हे शब्द शुद्धिचिकित्सक 'चूक' दाखवत नाही. याचा अर्थ 'आत' ते योग्य रीतीने जात आहेत.