दिवाळीची सुटी २१ दिवस असायची. मात्र ह्या सुटीचा आनंद शेवटच्या आठवड्यात लोप पावत असे. ह्याला कारण म्हणजे प्राथमिक शाळेत 'दिवाळीचा अभ्यास' आणि माध्यमिक शाळेत 'प्रश्नमालिका'.
दिवाळीच्या सुटीनंतर लगेचच ह्या गोष्टी 'सुपूर्त' करायच्या असल्याने त्या पुऱ्या करण्याचा ताण मनावर पडायचा. ... त्याची आठवण झाली.